| पाली/ वाघोशी | वार्ताहर |
राज्य शासनाने 24 मार्च 2023 ला तयार असणारी अधिसूचना आज लागू केली. तीन वर्षानंतर अधिसूचनेत बदल होऊन सोमवारी (दि. 27 मार्च) कायद्यात रूपांतर झाले आहे. प्रवर्ग मकफ मध्ये दुरुस्ती करून पदवीधर डीएड कला, क्रीडा शिक्षकांचा समावेश प्रवर्ग मकफ मध्ये केल्याने पदवीधर डीएड शिक्षकांचा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.
खाजगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम 12 अनुसूचि मफफ मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय दिलेली आहे. या प्रवर्गामध्ये पदवीधर डीएड शिक्षकांचा समावेश नसल्याने अनेक संस्था, शाळा आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथे पदवीधर डीएड शिक्षकांचा समावेश करून पदोन्नतीसाठी डावलल्या जात असायचे.
अधिसूचना निर्गमित होऊनही तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अधिसूचनेची कार्यवाही लागू होत नसल्याने महाराष्ट्र राज्य पदवीधर डी. एड. , कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघाने राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, अवर सचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी अशा उच्चपदस्थ अधिकारी व पदाधिकारी यांच्या वारंवार भेटी घेऊन निवेदने देऊन तसेच संघटनेतर्फे सुस्पष्ट अधिसूचना काढावी यासाठी पत्र आंदोलन देखील केले होते. शिक्षण विभागाने अधिसूचना प्रसिध्द केल्याचा आनंद व्यक्त करून आता शक्य तितक्या लवकर कृतीत आणून अन्यायग्रस्त पदवीधर डी. एड, कला, क्रीडा शिक्षकांना न्याय दयावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर डी. एड, कला-क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघाने केली आहे.