वातावरणातील बदल ठरतोय आरोग्यासाठी अपायकारक

। हमरापूर । प्रतिनिधी ।
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ होत असून वातावरणातील या बदलाचा ञास सर्वांनाच होत आहे. या व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे, घशात खवखव व उलटी सारखी लक्षणे वाढली आहेत. या वातावरणाचा व व्हायरलचा सर्वाधिक फटका लहान मुले तसेच वृद्धांना बसण्याची दाट शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुले व वृद्धांची काळजी घेण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वातावरणाच्या परिणामामुळे ज्यांना दम्याचा ञास होत आहे अशा ज्येष्ठांच्या श्‍वसनक्रियेवर परिणाम होत असून त्यांना अतिरिक्त ञास होत आहे. दम्याचा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका अधिक आहे. तापासह थंडी, सर्दी, खोकला, मळमळ, उलटी, अंग दुखणे आणि डोके दुखण्याचे विकार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनचे आठवडाभरात तालुक्यातील ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत.

Exit mobile version