कापडी पिशव्या देणारे यंत्र कार्यान्वित

| नवी मुंबई | वृत्तसंस्था |

वाशी येथील महाराजा भाजी व फळ मार्केट येथे सीएसआर उपक्रमांतर्गत कापडी पिशवी वेंडींग मशीन सुविधेचे लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झाले.

नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल नेटवर्कच्या सीएसआर उपक्रमामधून ही कापडी पिशवी वेंडिंग मशीन मार्केटच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. पुढील काही दिवसातच वाशी विभागातच आणखी दोन यंत्रे बसवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई डॉट कॉमचे मेहुल जैन यांनी दिली. वाशी सेक्टर 17 येथील मार्केटमध्ये लावलेल्या वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनवरील लाल बटण दाबल्यावर त्यामधील स्वयंचलित प्रणालीव्दारे कापडी पिशवी दिली जाते. साधारणत: 5 ते 6 किलो वजन पेलू शकेल अशा क्षमतेची ही कापडी पिशवी असून जर navimumbaicity.com हे ॲप मोबाइलमध्ये मोफत डाऊनलोड करून घेतल्यास ॲपमधील कोड स्कॅन केल्यानंतर मशीनव्दारे कापडी पिशवी प्राप्त होते.

Exit mobile version