| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे आतापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जवानांचादेखील समावेश आहे. किश्तवाडमधील माचैल माता मंदिरात गुरुपारपासून यात्रेला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेकडो भाविक या मंदिर परिसरात होते. त्याचवेळी येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला व अचानर पूर आला. पुरात या भागातील शेकडो घरे व वाहने वाहून गेली आहेत. ढगफुटीनंतर या भागात तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत घटनास्थळावरून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 80 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. अद्याप शेकडो लोकं बेपत्ता असल्याचे समजते.







