गडबमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस

ओढ्याचे पाणी शिरले गावात; जीवितहानी नाही
। गडब । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील गडब येथे सायंकाळी वादळी वार्‍यासह, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. सर्वत्र ढग दाटून आल्याने व बत्ती गुल झाल्याने अंधाराचे सावट पसरले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच त्रेधात्रिपीट उडवली.

गावाच्या पुर्वेकडे असणार्‍या डोगंरावर जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे डोंगरावरुन येणारे पाणी गावामधून जाणार्‍या ओढ्यातुन सरक्षक भिंत ओलांडुन गावात शिरले. अचानक या ओढ्यातून पाण्याचा लोट आला. एवढ्या जोरदार पाणी आल्याने अनेकांच्या वाहनांमध्ये पाणी शिरले; तसेच घरात, दुकांनामध्येही पाणी शिरले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाचा जोर कमी झाल्यावर काही वेळात हे पाणी कमी झाले. परंतु या पाण्यासोबत डोगर उतारावरुन वाहुन आलेल्या मातीमुळे गावात चिखलांचे साम्राज्य पसरले.

Exit mobile version