। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस सी.एम. ठाकूर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली आहे.
सी.एम. ठाकूर हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या. त्यांच्या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करुन सी.एम. ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यानुसार शेकापक्षातून ठाकूर यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे आस्वाद पाटील यांनी सांगितले.







