सीएनजी, पीएनजी पुन्हा महागला

मुंबई | वृत्तसंस्था |
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीदरम्यान, सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. सीएनजीच्या दरात 2.50 रूपयांनी वाढ झाली आहे, तर पीएनजीच्या दरात 1.50 रूपयांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे वर्षभरात सीएनजी आणि पीएनजी जवळपास 18 रूपयांनी महागला आहे.
या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणार्‍या वाहनांना मोठा फटका बसणार आहे. शिवाय, रिक्षा, टॅक्सी, बसेसना झालेल्या दरवाढीचा फटका बसणार आहे. तर, आता नव्या दरानुसार सीएनजी 66 रूपये किलो तर पीएनजी 40 रूपये किलो होणार आहे.
पीएनजी म्हणजे घरी येणार्‍या पाईप गॅसचे दर देखील वाढले आहेत. इंधनांच्या दरांत सतत होणारी दरवाढ पाहाता सर्वसामान्यांच्या खिशाला नव्या वर्षात कात्री बसणार आहे. तर गृहिणींचे आर्थिक बजेटही कोलमडणार आहे.

Exit mobile version