मुंबई | प्रतिनिधी |
सीएनजी दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी सकाळपासून म्हणजेच 18 डिसेंबर पासून लागू झाले आहेत. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता मुंबईत नवीन दर 63.50 रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याच वेळी, मुंबईतील पाइप नॅचरल गॅसची सुधारित किंमत 38 रुपये प्रति युनिटवर गेली आहे., मुंबई महानगर प्रदेशात गेल्या 11 महिन्यांत सीएनजीच्या किमतीत 16 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर झाला आहे.