कोस्टल रोड बांधकाम मच्छिमारांनी थांबविले

आधी मासेमारी नौकांना चॅनल द्या -रमेश पाटील
मुंबई | प्रतिनिधी |

भर समुद्रात भराव करून उभारण्यात येत असलेला कोस्टल रोड मार्गातुन मासेमारी नौकांना ये जा करण्यासाठी असलेल्या दोन पीलरमधील अंतर 60 मीटर ऐवजी 200 मीटर केल्याशिवाय कोस्टल रोडचे काम सुरू करू नये, जोपर्यंत मासेमारी लोकांना योग्य मार्ग मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पुनर्वसन अथवा भरपाईच्या मुद्यावरर कोळी समाज बोलणार नसल्याचा इशारा कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी दिला.
महागडा कोस्टल रोड उभारत असताना कोस्टल रोड खालुन समुद्रात येजा करण्याचा मार्ग अरूंद असल्याचे लक्षात आल्यानंतर वरळी कोळीवाड्यातील पारंपारिक मच्छिमरांनी बांधकाम थांबविले होते. त्या अनुषंगाने कोळी महासंघाच्या वतीने शिष्टमंडळाने मच्छिमारांची भेट घेतली असता रमेश दादा पाटील बोलत होते.
महानगरपालिकेने मच्छिमारांच्या भावना आणि आमच्या मागण्या रास्त असल्याने त्या शासनापर्यंत पोहोचवाव्या, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी समाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मार्गिका रुंद करावी अशी मागणी यावेळी रमेशदादा पाटील यांनी केली.
यावेळी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कोळी महिलांच्या नेत्या राजश्री भानजी, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन चे कार्याध्यक्ष विकास कोळी, नितेश पाटील, विजय पाटील, रुपेश पाटील आणि वरळी येथील सगळ्या संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित.
वरळी वांद्रे सिलिंग उभारताना त्या सी-लिंक मधील वरळी गावातील मासेमारी नौकांना समुद्रात जाण्याच्या मार्गातील चॅनल रुंद करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी न करता अवघे 30 मीटर रुंदीचा मार्ग ठेवून फसवणूक केली असल्याची भावना तीव्र असताना आता मात्र आम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसून 200 मीटर रुंदी चे चैनल झाल्याशिवाय काम होऊ न देण्याचा निर्धार वरळी येथील मच्छीमारांनी केला आहे. त्याला जाहीर पाठिंबा कोळी महासंघाने दिला.

निर्णय शासन घेईल : आयुक्त
कोस्टल रोड वरील वरळी येथील मासेमारांना ये जा करण्याचा मार्ग 60 मीटरचा आहे मात्र तो मच्छिमारांच्या मागणीप्रमाणे 200 मीटर करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेण्याबरोबर या प्रस्तावाला शासनाने मान्यता द्यावी लागेल आणि त्यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे आपण पाठविणार असल्याचे आश्‍वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

Exit mobile version