| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागीय नारळफोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (दि.26) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही स्पर्धा अलिबागमधील श्रीबाग येथील भंडारी भवनाच्या, स्व. गोविंद बाबू नार्वेकर सभागृहात होणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुकांनी 22 जुलैपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भंडारी समाजातील खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघाला डबल डोअर फ्रिज, द्वितीय क्रमांकाला वॉशिंग मशीन, तृतीय क्रमांकाला स्मार्ट टीव्ही आणि चतुर्थ क्रमांकाला सायकल देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फटकाबाज, उत्कृष्ट नारळ फोडणारा आणि उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ अशा विशेष पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे. प्रत्येक संघात एकच स्पर्धक असणार असून, स्पर्धेत केवळ भंडारी समाजातील खेळाडूंनाच सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त 32 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. आयोजक समितीचा निर्णय अंतिम राहील, असे काही महत्त्वाचे नियमही जाहीर करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी मनोज मयेकर (8806361111), संतोष मोरे (9271718519), अमोल मयेकर (9545945718) आणि राजेंद्र बांदिवडेकर (9158144326) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अलिबागमध्ये नारळफोडी स्पर्धेचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606