नागावमध्ये नारळफोडी स्पर्धा

प्रथम क्रमाकांस 51 हजार व आकर्षक चषक

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यात नागाव येथे भव्य नारळफोडी स्पर्धेचे रविवार, दि. 27 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागाव बंदर रोड, बहर कॉटेज, शिवाजी महाराज चौकनजीक ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रूपये 51 हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. नागावमधील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाच्या वतीने भव्य व आकर्षक अशी बक्षिसांच्या नारळफोडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या नारळफोडी स्पर्धेत आकर्षक असे प्रथम क्रमांकास रूपये 51 हजार रोख व चषक देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकास 21 हजार व चषक, तृतीय क्रमांकास 5 हजार 100 व चषक, चतुर्थ क्रमांकास 5 हजार 100 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विपुल राऊळ 7798642214, शैलेश नाईक 9850231595 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत प्रवेश फी रूपये दोन हजार ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक संघाकडे पाच नारळ असतील. स्पर्धा हातावर खेळली जाईल. स्पर्धेतील नियम व अटी मंडळाचे असतील. प्रथम येणार्‍या संघास प्राधान्य देण्यात येईल. एका संघामध्ये दोन खेळाडू असू शकतात, पण नंतर दुसरा संघ खेळू शकत नाही. स्पर्धा अ व ब लॉटमध्ये खेळविण्यात येईल. पंचाचा निर्णय अंतिम राहील. ही नियमावाली स्पर्धेत सहभागी संघास बंधनकारक राहील, असे आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version