माघी गणेशोत्सवानिमित्त कुलाबा किल्ला सज्ज; प्रवेश शुल्क माफ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माघी गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या कुलाबा किल्ल्यातील गणेश पंचयतन मंदिर सज्ज झाले असून. माघी गणेशोत्सव मंडळ तसेच कुलाबा किल्ला जतन व संवर्धन समितीची तयारी पुर्ण झाली आहे. अलिबागमधील कुलाबा किल्लयात दरवर्षी माघ चतुर्थीला श्री गणेश जयंती निमित्त कुलाबा किल्लयातील गणेश मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त येणार्‍या भाविकांसाठी त्यादिवशी कुलाबा किल्लयातील प्रवेश शुल्क माफ करण्यात आले असल्याची माहिती कुलाबा किल्ला जतन व संवर्धन समितीने दिली आहे. हे प्रवेशशुल्क श्री गणेश जयंती दिनी घेण्यात येऊ नये अशी विनंती कुलाबा किल्ला जतन व संवर्धन समितीने केली होती. लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे खासदार सुनील तटकरे हे दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांच्यकडे त्वरीत पाठपुरावा करून माघी गणेशोत्सवाची परवानगी व त्या दिवशी किल्लयात येणार्‍या गणेशभक्त व भाविकांकडून प्रवेशशुल्क घेतले जायचे ते प्रवेशशुल्क घेण्यात येऊ नये यासाठी प्रयत्न केले.


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी 10 जाने . 2022 रोजी केंद्रीय पुरातत्व विभागाने देशातील त्यांच्या अखत्यारीतील सर्व गडकिल्ले व पुरातन वास्तू पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक काढले होते . त्यामुळे यावर्षी माघी गणेशोत्सवाची परवानगी मिळेल किंवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब कुलाबा किल्ला जतन व संवर्धन समितीच्या शिवभक्त किशोर अनुभवणे, यतिराज पाटील , आकाश राणे, वैभव भालकर, ऋषिकेश चिंदरकर यांच्या लक्षात आली. समितीने त्वरीत रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला. प्रवेशशुल्क माफ केल्याबद्दल याबद्दल सर्व गणेशभक्त, समस्त अलिबागकर आणि कुलाबा किल्ला जतन व संवर्धन समितीने आभार मानले आहेत.

Exit mobile version