कर्जत तालुक्यात थंडीची चाहूल

| नेरळ | प्रतिनिधी |

नोव्हेंबर महिना सुरु झाल्याने वातावरणात गारवा पसरतो. त्यानुसार रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र, दिवसा ऑक्टोबर हिटसारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सकाळच्या वेळी पसरलेले धुके हे मॉर्निंग वॉकसाठी निघणारे यांच्यासाठी आल्हाददायक वातावरण थंडीची चाहूल असल्याचे दिसून येत आहे.
थंडीची चाहूल लागल्याने माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचे लोंढे माथेरानकडे येऊ लागले आहेत. माथेरानमध्ये सध्या पर्यटकांचे लोंढे आल्याने पर्यटन व्यवसायासाठी थंडी सुगीचे दिवस आणू शकते. असे वातावरणात माथेरान शहरात पर्यटकांच्या गर्दीमुळे दिसून येत आहे. माथेरान शहरात पर्यटक तेथील गुलाबी म्हणजे अंगाला बोचरी वाटणार्‍या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले असल्याने सर्वत्र थन्डी येऊ घातली असल्याचे चित्र सकाळच्या धुक्याच्या दुलईमुळे निर्माण झाले आहे. वातावरणात रात्री अकरा नंतर निर्माण होणार गारवा सकाळ पर्यंत असल्याने थंडीची चाहूल म्हटली जात आहे.

Exit mobile version