जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकरांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्रीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना डघजउक अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी बांधवांच्या प्रगतीसाठी मागील वर्षभरात कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्रीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी राबविलेल्या उपक्रमाची डघजउक अवॉर्ड्स या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने दखल घेतली आहे.

जवळपास 500 हून अधिक नामांकनांमधून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील सप्तसूत्री कार्यक्रमाकरिता डॉ.कल्याणकर व रायगड जिल्हा प्रशासनास जिल्हा प्रशासन या संवर्गातील रौप्यपदक जाहीर करण्यात आले. अशाप्रकारे हे अतिशय अवघड टप्पे पार पाडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकराच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा प्रशासनाला हे यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सप्तसूत्री कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आरोग्य/बालविवाह रोखणे, कृषी विषयक योजनांची माहिती देवून अंमलबजावणी करणे, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व अभ्यासिका/ ग्रंथालय, सर्व प्रकारच्या दाखल्यांचे वाटप रेशन कार्ड/आधार कार्ड वाटप, स्थलांतरण थांबविणे व रोजगार निर्मिती, वन हक्क अधिनियम 2006 ची अंमलबजावणी, याचा समावेश करण्यात आला.

Exit mobile version