। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे सिंहगड हिंगणे परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत एका महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला. सई श्रीकांत भागवत (20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. गुरुवारी (दि. 26) दुपारी ती दुचाकीवरुन घरी निघाली होती. हिंगणेकडून तुकाईनगर मार्गे जातांना रस्त्यावर वाहणारे सांडपाणी चुकवण्यासाठी तिने दुचाकी थोडी बाजूला घेतली. त्याचवेळी मागून आलेल्या सिमेंट ट्रकने तिला धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहेत.






