भीषण! एसटी बस आणि ट्रकची धडक; सहा जणांचा मृत्यू

अनेक प्रवासी गंभीर जखमी; दोन्ही वाहनांचे नुकसान

। जालना । प्रतिनिधी ।

जालना-बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

जालना-वडीगोद्री मार्गावर मठ तांडा येथे गुरूवारी (दि.19) सकाळी हा भीषण अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार झाली की या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेतील बसमध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी होते. यापैकी सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच, हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version