| पनवेल | वार्ताहर |
टाटा टेम्पोवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने अज्ञात वाहनाला ठोकर दिली. यात शेख यासीनभाई अहमदभाई याचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील टाटा टेम्पोवरील चालक शेख यासिनभाई अहमदभाई (48, रा. गुजरात) हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने पुणे बाजूकडे वेगात चालवीत घेऊन जात असताना किमी 9.800 (कोनजवळ) येथे आले. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोच्या पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनास जोरदार ठोकर मारून अपघात घडला आहे. या अपघातात चालक शेख यासीनभाई यांच्या तोंडाला, डोक्याला, छातीला, गंभीर दुखापत झाल्या असून, त्यांना अपघात स्थळी हजर असलेल्या आयआरबी रुग्णवाहिकेमधील डॉ. मंगेश भगत यांनी तपासून मृत घोषित केले. अपघाताच्या ठिकाणी पळस्पे मोबाईलवरील स्टाफसह तसेच आयआरबी स्टाफ, देवदूत टीम, पनवेल तालुका पोलीस ठाणे पीएसआय हर्षल राजपूत व स्टाफ, पनवेल मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर व स्टाफ हजर होते.