कुंभारवाड्यात रंगीबेरंगी हंड्यांची लगबग

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

गोकुळाष्टमीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, पनवेल शहरातील कुंभारवाड्यात हंड्या बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सध्या गोविंदा पथकांसाठी विविध आकारांच्या आणि आकर्षक रंगांच्या हंड्या तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. माती तसेच विविध साहित्याचा वापर करून हंड्यांना आकार दिला जात आहे. त्यानंतर या हंड्यांवर आकर्षक रंगकाम आणि सजावट केली जाणार आहे.लाल, पिवळा, हिरवा, निळा यांसह विविध रंगांच्या हंड्या यंदा बाजारात पाहायला मिळणार आहेत. गोविंदा पथकांच्या मागणीनुसार हंड्यांचे आकार आणि सजावटीतही विविधता ठेवली जात आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी या हंड्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे मागणी लक्षात घेऊन कारागिरांनी आतापासूनच कामाला वेग दिला आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात सकाळपासून रात्रीपर्यंत हंड्या तयार करण्याची लगबग सुरू आहे.

Exit mobile version