आ. जयंत पाटील यांच्या हस्ते जागर कदम वंशाचा पुस्तकाचे प्रकाशन

। खेड । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी लिहिलेल्या ङ्गजागर कदम वंशाचाफ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि.13) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे अतिशय दिमाखात पार पडला. यावेळी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन कीर्तिकर, राज्याचे गृह आणि वित्त नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आ. योगेश कदम आणि खेड-दापोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कदम वंशाचा इतिहास हा कदंब राज्य अस्तित्वात असल्यापासूनचा आहे. अफगाणिस्तानमधील कंदाहारपर्यंत हे साम्राज्य त्याकाळी पसरले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोव्यापर्यंत या राज्याच्या सीमा विस्तारल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील कदम वंशाने महाराजांना मोलाची साथ दिली होती. हा सगळा दैदीप्यमान इतिहास या पुस्तकाद्वारे मांडण्यात आला आहे. हे पुस्तक भावी पिढ्यांना नक्की दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा यासमयी उपस्थितीतांना संबोधित करताना व्यक्त केली. याप्रसंगी लोकनेते रामदास कदम यांच्या नावाने नुतनीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण देखील पार पडले.

Exit mobile version