स्टॉलधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ. निकम सरसावले

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण रेल्वे स्टेशन येथील कार्यरत स्टॉलधारकांच्या अनेक प्रलंबित समस्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा स्वरूपाचे निवेदन चिपळूण संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांनी रत्नागिरी येथे रेल्वेचे रिजनल मॅनेजर उपेंद्र शेंडे यांच्याकडे दिले.यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई,स्टॉलधारक शेखर रेडीज,अविनाश खताते, विक्रमसिंघ पुरोहित,विलास पिंपपुटकर,अरविद लकेश्री आदी उपस्थित होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवाही बंद असल्याने सदर कालावधीत स्टॉलधारकांनी आगाऊ भरलेल्या भाड्याची परतफेड, रत्नागिरीच्या निकषावर चिपळूण व खेडला लायसन्स फि आकारु नये, अद्याप सर्व गाड्या सुरु नसल्याने काही स्टॉल धारकांना वीज,पाणी व इतर खर्च भागविणे अशक्य झाल्याने व्यवसाय बंद असताना आकारण्यात आलेली लायसन्स फि माफ व्हावी, रेल्वे कर्मचायांबरोबरच सर्व स्टॉलधारक,कर्मचारी यांची कोव्हिड तपासणी व लसीकरण करावे,कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती संपल्यानंतर तीन वर्षाचा कॉन्ट्रक्ट अवधीमध्ये वाढ, विक्री करावयाचे पदार्थ वाढवून त्याचा दरही वाढीवरित्या निश्‍चित करुन मिळावा अशा अनेक प्रलंबित मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यासाठी आ. निकम स्टॉलधारक ठेकेदारांना घेऊन रत्नागिरी येथे गेले होते.यावेळी शेंडे यांनी सर्व मागण्या स्थानिक तसेच वरिष्ठ स्तरावरून सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version