‘नाट्य रसिकहो कल्याण’ आयोजित अभिवाचन स्पर्धा

जुईली टेमकरने पटकावला प्रथम क्रमांक

। अलिबाग । वार्ताहर ।

नाट्य रसिकहो कल्याण आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघतर्फे नुकतीच संत रविदास जयंती निमित्ताने विनोदी कथा अभिवाचन स्पर्धा कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे संपन्न झाली.

यावेळी विनोद तावडे, भकू बारस्कर, राम बनसोडे, विलास भोईर, सतीश देसाई, भालचंद्र कुबल, अनंत सुतार आणि सुरेश शांताराम पवार या मान्यवरांचे हस्ते स्पर्धा विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेत श्रीरंग थिएटर डोंबिवली या संघाने सांघिक प्रथम क्रमांकासह पुरुष अभिवाचक प्रथम (देवेंद्र शिंदे) आणि द्वितीय (सिद्धांत साळवी) हे पारितोषिक देखील पटकावले. कल्याणच्या राजयोग प्रतिष्ठान या संस्थेने द्वितीय क्रमांकाच्या सांघिक पुरस्कारासह पुरुष अभिवाचक द्वितीय (निलेश शास्त्री) हे पारितोषिक पटकावले. अनंत सांस्कृतिक व सामाजिक कलामंच पेझारी-अलिबाग या संस्थेने तृतीय क्रमांकासह स्त्री अभिवाचक प्रथम- जुईली टेमकर, उत्कृष्ट पुरुष अभिवाचक उत्तेजनार्थ राजन पांचाळ यांनी पारितोषिके पटकावले.

चला नाटक करूय सातारा आणि वसुधा क्रिएशन पुणे या संस्थांनी सांघिक उत्तेजनार्थ हे पारितोषिक पटकावले. स्त्री अभिवाचक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नम्रता कलाविष्कार पुणे या संस्थेच्या डॉक्टर सोनाली कुलकर्णी-गायकवाड यांनी पटकाविले तर दिप्ती भारंगे, नीता मोरे, सुशील शिरोडकर उत्कृष्ट अभिवाचनाचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. यंदा नाट्य रसिकहो कल्याण या संस्थेने कलाविष्कार सुरू केलेला शिस्तबद्ध संघ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नम्रता कलाविष्कार पुणे या संस्थेने पटकावला. तर, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार राजयोग प्रतिष्ठान कल्याण या संस्थेने पटकावला.

Exit mobile version