जनरल अरुणकुमार वैद्य यांचा स्मृतीदिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतीय सेनेतील जनरल अरुणकुमार वैद्य यांचा अलिबागमध्ये स्मृतीदिन साजरा करण्यात आला. स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्यावतीने हा कार्यक्रम प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय तालुका ग्रंथालयातील रामनारायण पत्रकार भवनमध्ये गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आला. जनरल अरुण कुमार वैद्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष सखाराम पवार, ज्येष्ठ नाट्यकर्मी शरद कोरडे, चारुशिला कोरडे, माजी नगरसेवक आर. के. घरत, मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत, शेकापचे अलिबाग शहर चिटणीस अशोक प्रधान, माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान, नागेश कुलकर्णी, ॲड. के.डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार उमाजी केळुस्कर, ॲड. वैभव भोळे, जिल्हा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, नंदु थळकर, आरएसपीचे जिल्हा समादेशक रविंद्र वाघमारे, ॲड. राजेंद्र जैन, राजाराम भगत,ज्योती म्हात्रे, जिवीका कुरेशी आदी मान्यवरांसह पत्रकार व अलिबागचे नागरिक उपस्थित होते.

यावेळी ॲड. वैभव भोळे, ॲड. के.डी. पाटील यांच्यासह नंदु थळकर, अशोक प्रधान, नागेश कुलकर्णी यांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याची माहिती दिली. एक शिस्तबध्द अधिकारी म्हणून त्यांनी सैन्य दलात काम केले. भारत-पाकीस्तान युध्दातदेखील त्यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. त्यांची कामगिरी अलिबागसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे असे गौरोदगार व्यक्त केले.

Exit mobile version