। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजीमहाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या 293 व्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग मधील त्यांच्या समाधीवर आयएनएस आंग्रे पथकाचे कमांडिंग ऑफिसर कोमोडोर अदित्य हाडा यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, कान्होजी राजांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, प्रदीप नाईक उपस्थित होते.
अलिबागमध्ये सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची पुण्यतिथी
