मोहोपाडा परिसरात विकासकामांचा प्रारंभ

। रसायनी। वार्ताहर ।
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध विकासकामांचे उदघाटन तर काही कामांचे भूमीपूजन करण्यात आले. मोहोपाडावाडीतील लहानग्या मुलांना खेळण्यासाठी ग्रामपंचायत निधीतून वाडीच्या प्रवेशद्वाराजवळ खेळण्यांच्या साहित्य संचाचे उदघाटन विमल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.सायंकाळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने सरपंच ताई पवार यांनी मोहोपाडा वाडी,खोंडावाडी व पानशिल येथे हायमास्ट उभारला या कामाचे उदघाटन सरपंच ताईं पवार, माजी सरपंच संदिप मुंढे व ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोहोपाडा आदीवासीवाडीत पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.तसेच मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत कचरा साठवण करण्यासाठी ग्रामपंचायत निधीतून शंभर प्लास्टिक डस्टबिन देण्यात आले.तसेच आदीवासीवाडीत सभामंडपाचे भूमीपूजन करण्यात आले.

Exit mobile version