माजी आ. पंडित पाटील यांच्या प्रयत्नांना यश
। अलिबाग । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून अलिबाग तालुक्यातील पेझारी चेक पोस्ट ते धेरंड या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामास शनिवारी सुरुवात करण्यात आली.

शहापूर-धेरंड परिसरातील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन पंडित पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर एमआयडीच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शहापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती थळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी अलिबाग पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, शहापूर सरपंच भारती थळे, सदस्य अनिल म्हात्रे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, अॅड. कुंदन पाटील, माजी सदस्य सतीश म्हात्रे, धर्माजी पाटील, प्रसाद पाटील, जो.जो. गुरुजी, पांडुरंग पाटील, निलेश पाटील, मंगेश पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याची दुरुस्ती होत असल्याने ग्रामस्थांकडून शेकापला धन्यवाद देण्यात येत आहेत.






