| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात पदवीधर मतदारसंघातील मतदात्यांना मतदान करता यावे, यासाठी मुरुड तहसील कार्यालयात फॉर्म वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान संपन्न होणार आहे. यासाठी अर्ज वाटप प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत हे फॉर्म जमा करावयाचे आहेत.
कोणत्याही शाखेचा पदवीधर असणाऱ्याला या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. फॉर्म जमा करतेवेळी पदवीधर गुणपत्रक, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रति अर्जाला जोडण्याचे आवाहन मुरुड तहसील कार्यलयामार्फत करण्यात आले आहे. सन 2020 पर्यंत पदवीधर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राथमिक शाळेतील,माध्यमिक व उच माध्यमिक तसेच महाविद्यलयातील सर्व पदवीप्राप्त शिक्षकांनी फॉर्म भरून मतदाते होण्यासाठी सहकार्य करावे असे, जाहीर आवाहन महसूल विभागाने केले आहे.