नागाव बंदर रस्त्याच्या कामाला सुरुवात

अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी केला शुभारंभ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

ग्रुप ग्रामपंचायत नागांव हद्दीतील नागांव बंदर रस्त्याच्या कामाला सोमवार दि.31 जानेवारी रोजी नागांव समुद्र किनार्‍यावर रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यावेळी नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच निखिल मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र नागलेकर, श्रीकांत आठवले, परेश ठाकूर, हर्षदा मयेकर, मानसी ठाकूर, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. सदर रस्त्यासाठी निधी मंजुर करुन काम सुरु करण्याची मागणी नागाव ग्रामस्थांच्यावतीने सरपंच निखील मयेकर यांनी केली होती. तातडीने सदर काम सुरु न केल्यास उपोषण करण्याचा इशारा निखील मयेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. जिल्हा परिषदेचे गटनेते अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी या कामात पुढाकार घेत शेकापक्षाच्या माध्यमातून सदर कामाला निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करुन धन्यवाद दिले जात आहेत.

Exit mobile version