| पनवेल | वार्ताहर |
जिल्हा नियोजन निधीतून पनवेल ग्रामीण भागातील आदई गाव येथे साकव बांधणे (रू. 5 लक्ष) या कामाचा रविवारी रामनवमी दिनी मुहुर्तावर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी योगेश तांडेल, ज्ञानेश्वर बडे, दीपक घरत, यतीन देशमुख, राकेश गोवारी, जगदीश शेलके, ज्ञानेश्वर भंडारी, संतोष गोळे, बिपीन झुरे, राजेश वैंगणकर, सतीश गायकर, अविनाश गव्हाणकर, आदई सरपंच रमाकांत गरूडे, माजी उपसरपंच विलास शेळके, प्रभाकर शेळके, सदस्य श्रीचंद भंडारी, पोलीस पाटील कैलास गरुडे, संदेश पाटील, भरत भंडारी, सत्यवान काकडे, बाळाराम पाटील, विष्णू शेळके, शंकर पाटील,अनिल शेलके, रविंद्र शेलके आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.