| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मानकुळे ग्राम पंचायत हद्दीतील नारंगी खारभूमी योजनेवर उधानाने गेलेल्या बंधार्याच्या खांडीच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ मानकुळे माजी सरपंच सत्यविजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मानकुळे ग्राम पंचायत हद्दीतील नारंगी खार भूमी योजनेवर समुद्राचे भरतीचे वेळी बंधार्याला खांड जाऊन शेतीत व गावात समुद्राचे खारे पाणी येऊन खूप नुकसान झाले होते, सदरचे होणारे नुकसान होऊ नये म्हणून खारभूमी कार्यालय पेणचे कार्यकारी अभियंता सावंत,अलिबाग खार भूमी कार्यालयाचे उप अभियंता पेडेकर, यांनी पाहणी करून सदरचे काम तत्काळ करण्याची सूचना देऊन कामाला सुरुवात करण्यात आली, सदर कामाचे शुभारंभ श्रीफळ वाढ ऊन माजी सरपंच सत्यविजय पाटील, चेतन ठाकूर यांचे हस्ते सुरुवात करण्यात आली, सदर वेळी तानाजी पाटील, मंगल पाटील, दिनांजय पाटील, संतोष म्हात्रे, प्रदीप पाटील, व कामगारांचे मुकादम अशोक रामा पाटील व कामगार उपस्थित होते.