| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौळवाडी येथील आदिवासी समाजातील एक अल्पवयीन मुलीला मोबाईल वापरण्याच्या कारणावरून तीची आई रागावली यामुळे ती अल्पवयीन मुलगी रात्री घर सोडून निघून गेली होती. याबाबत तिची आईने कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असता कोलाड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी तत्परता दाखवून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील, पोलीस हवालदार भास्कर पाटील, पोलीस हवालदार वसंत सिद यांचे पथक तयार करून सदर मुलीचा शोध घेतला असता सदर पथकाने सुतारवाडी हद्दीतील गुप्त बातमीदार, पोलीस मित्र यांचे कडून माहिती घेऊन सदर अल्पवयीन मुलीस दणकी आदिवासी वाडी पाथर शेत येथील धरणाचे जंगल भागातून शोधून काढून तिची चौकशी करून तिचे समुपदेशन करून तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. कोणतीही माहिती नसताना फक्त बातमीदारांमार्फत बातमी काढून सदर पथकाने तीन ते चार तास जंगल भागात शोध घेऊन सदर अल्पवयीन मुलीचा तत्परतेने शोध घेतला आहे. कोलाड पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल कोलाड परिसरात पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
कोलाड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
