मुंबईमधील बोट शर्यतीत महिलांची प्रशंसनीय कामगिरी; खराब हवामानातही स्पर्धेत वर्चस्व

मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गेल्या ५ दिवसांपासून बोट रेसिंग खडतर हवामान असूनही सुरु होती. या स्पर्धेमध्ये १०१ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी २६ महिला होत्या. या स्पर्धेत ६ महिला स्पर्धकांचा वरचष्मा होता. यंदा लाटांवर स्वार असलेल्या नौकांचे ९ वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. गेल्या २ दिवसांत जोरदार वारे वाहात होते. त्यामुळे या स्पर्धेवर ‘काळे ढग’ पसरणार की काय, अशी शक्यता आयोजकांना वाटत होती. पुरुष आणि महिला स्पर्धक त्यांच्या स्पर्धा पार पाडतील का, ‘समुद्रराजा’ खवळेल की काय, याचीही धाकधुक सर्वांना होती.

मात्र कसलेल्या ‘दर्यावर्दीं’नी ताशी २ सागरी मैल वेगाने स्पर्धेचा प्रारंभ केला आणि कोणत्याही अडथळयांचा विचार झटकून, काहीही तमा न बाळगता ताशी १७ सागरी मैल वेगाने बोटी हाकल्या. नॅक्रा’ आणि ‘आयक्यू फॉईल’ (एफओआयएल) यांनी भारतीय सागरात झालेल्या या शर्यतीत पहिल्यांदाच पदार्पण केले. या शर्यतीच्या निमित्ताने एकूण १७ जणांनी भारतीय जलक्षेत्रात पदार्पण करताना पाहिले. सर्व ९ वर्गातील विजेते : लेसर (मानक)- सब विष्णु सर्वानन, लेसर (रेडियल)- रितिका डांगी, आरएस एक्स : (महिला)-ईश्वरिया गणेश, आरएस एक्स : (पुरुष)- व्ही पी पाठक., ४९ एफएक्स : हर्षिता तोमर आणि स्वेता शेरवेगर, ४९ – प्रिन्स नोबल आणि मनु फ्रान्सिस, ४७० मिक्स : (एच) उमा चौहान, (सी)- रवींद्र कुमार शर्मा, आयक्यू फॉइल- जेरोम के एस आणि एनएसीआरए (नॅक्रा) : (एच) एकता यादव, (सी)- कार्तिक बी.

१५ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या शर्यतीची सांगता रविवारी (दि. 19) झाली. सर्व स्पर्धकांचा उत्साह पाहून ‘रिगाटा’च्या आयोजकांना, नौदल अधिका-यांनाही कमालीचे आश्चर्य वाटले.

Exit mobile version