। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान मध्ये विविध विकासकामे सुरू असून काही पूर्ण होऊन काही प्रस्तावित आहेत. या विकासकामांसाठी आयुक्तांनी सकारात्मकता दाखवून माथेरानवर विशेष आस्था दाखवली होती. त्यातील काही कामे पूर्ण झाली असून काही दिवसापूर्वी त्यांचे लोकार्पण झाले. त्या कामांचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई आयक्त तथा संचालक डॉ.किरण कुलकर्णी यांनी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेला भेट दिली.
माथेरान जागतिक दर्जाचे पर्यटन असून येथे पॉईंट, रस्ते यांचे पर्यावरण पूरक सुशोभीकरण होत आहे. यासाठी राज्याकडून माथेरानला भरघोस निधी प्राप्त झाला. कामे सुरू होऊन पूर्ण झाली तर काही प्रस्तावित आहेत याचा इत्यंभूत आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी माथेरान पालिकेला धडक दिली.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी पालिकेत आले.त्यावेळेस मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे व नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. शाल, फळांची करंडी व फोटो फ्रेम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.