| चिरनेर | प्रतिनिधी |
गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता, चिरनेर गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच भास्कर मसणाची मोकल यांनी व्यक्त केला आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, शेकाप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार करीत चिरनेर ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता काबीज केली आहे.
सरपंचपदाची थेट निवडणूक लढवित विजय संपादन केलेले इंडिया आघाडी शिवसेनेचे सरपंच भास्कर मसणाजी मोकल यांनी 17 नोव्हेंबर रोजी आपल्या सरपंच पदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सचिन रामदास घबाडी यांनी बिनविरोध विजय संपादन केला आहे. यावेळी उपसरपंच पदासाठी अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे सचिन घबाडी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा नायब तहसिलदार नरेश पेढवी यांनी केली.
चिरनेर ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे करण्यात येईल असे नवनिर्वाचित उपसरपंच सचिन घबाडी यांनी सांगितले. यावेळी प्रफुल्ल खारपाटील, पद्माकर फोफेरकर, समाधान ठाकूर ,अरुण पाटील, दीपक कातकरी, समीर डुंगीकर, मृणाली ठाकूर, समुद्रा म्हात्रे, वनिता गोंधळी, नीलम चौलकर, यशोदा कातकरी, निकिता नारंगीकर, जयश्री चिर्लेकर, भारती ठाकूर या नवनिर्वाचित शिलेदारांनी आपल्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, शिवसेनेचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे सुरेश पाटील, शुभांगी पाटील, गणेश म्हात्रे, चांगदेव जोशी, गोपीनाथ गोंधळी, पद्माकर मोकल, राजेंद्र भगत, किरण कुंभार, चंद्रकांत गोंधळी, कृष्णा म्हात्रे, अमेय ठाकूर, नितीन नारंगीकर, आशीर्वाद ठाकूर, धनेश ठाकूर, भूषण मोकल, नितीन म्हात्रे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते