| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
आजचा दिवस हा शहरासाठी दुग्धशर्करा योग आहे. हा दिवस प्रेरणा दिवस आहे. सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने सासू-सुनेचे नाते कसे असावे, हे एक उत्तम उदाहरण आहे. बऱ्याच भावनांची उलगड झाली. त्यात सर्वप्रथम पक्षनिष्ठा होती. वारसा आणि संस्कराची जाणीव ठेवून सुप्रिया पाटील व्यक्त झाल्या. हा संस्काराचा वारसा सुप्रियाताई आणि चिऊताई खंबीरपणे चालवित आहेत. काल झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत निवडून आलो. यामध्ये पक्ष नेतृत्वाला आणि शहरातील सर्वांचे लाडके प्रशांत नाईक यांना श्रेय दिले जात आहे.
तो वसा, संस्कृतीचा वारसा सुप्रिया पाटील, सुनीता नाईक, स्व. नमिता नाईक आणि आता अक्षया नाईक जपत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवून अलिबागचे नाव अक्षया नाईक यांनी राज्यामध्ये कोरले आहे. जनसेवेचा वारसा जपण्याची संधी मिळाली. शहराच्या विकासासाठी तो कारभार पुढे सक्षमपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. या निवडणुकीत किंगमेकर प्रशांत नाईक यांनी त्यांचा आदर्श दाखवून दिला आहे. उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पडद्यामागे राहून नृपाल पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनातून काम करून अलिबागचे नाव एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.





