खारआंबोळीत सामुदायिक शेती

250 गावकऱ्यांनी एकत्र येत केली भातबांधणी

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

एकीकडे कोकणात शेतीचा कल कमी होत असताना रायगडमध्ये मुरुड तालुक्यात खारआंबोळी गावात 250 गावकऱ्यांनी देवळासमोरील शेतीत भात लावणी पारंपरिक गीते बोलत जुलैला पेरणी केली होती. त्याची कापणी केल्यानंतर शनिवारी सामुदायिक भातबांधणी करून शेतात रचून ठेवले, अशी माहिती माजी सरपंच मनोज कमाने यांनी दिली.

गावागावातील मतभेद विसरून गावच्या शेतात हाक दिल्याबरोबर पुरुष सकाळी 7 वाजल्यापासून कामाला येतात. बांधणीचे काम लवकर व्हावे म्हणून पारंपरिक पद्धतीने आजही काम करण्यात येत आहे. गावातील मंडळी कुशल कामगार असून, बाहेर दिवसाला एक हजार मजुरी घेतात. परंतु, भातझोडणीच्या कामाला स्वतःहून हजार राहतात.

तालुक्यात तीन हजार हेक्टर जमिनीवर भात शेती केली जाते. भात पीक हे मुख्य पीक आहे. खारआंबोळी गावची शेती सर्वात शेवट लावतात. कारण अनेक ठिकाणी अति पावसाने गावकऱ्यांचे राब वाहून जातात. त्यामुळे गावची शेती लावून झाल्यावर उरलेले राब गावकऱ्यांना देण्यात येतात, असा सार्वजनिक हिताचा विचार हा गाव जपतो.

Exit mobile version