शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या; शेकापची मागणी

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
। अलिबाग । शहर प्रतिनीधी ।
निलंगा तालुक्यामध्ये अतिवृष्टी व वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये विशेषतः सोयाबीन, ऊस, मुग, उडीद, भुईमुग व इतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातालाआलेले पीक वाया गेले. परिणामी तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सरकारच्या धोरणांमुळे आधीपासुनच शेतकरी त्रस्त असतानाच त्यांच्यावर आता अस्मानी संकट कोसळे आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकर्‍यांना प्रती एकरी 50 हजार रुपये अशी सरसकट नुकसान देणयात यावी, अशी मागणी निलंगा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पदाधिकार्‍यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेकापतर्फे उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाने जाणीवपुर्वक लक्ष द्यावे. तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version