सिडकोचे आश्वासन
। उरण । वार्ताहर ।
सिडकोची पाईपलाईन फुटून नुकसान झालेल्या दिघोडेतील संबंधितांना येत्या पंधरा दिवसात भरपाई दिली जाणार आहे. तसे लेखी पत्र सिडकोच्या प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याने गेले दोन दिवस काँग्रेस नेते डॉ.मनिष पाटील यांनी सुरु केलेले बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दिघोडे येथील एकूण 18 नुकसानग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक भरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरु होते. त्याची दखल घेत सिडको प्रशासनाने डॉ.मनिष पाटील यांच्यासोबत बसलेल्या दिघोडे ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यासाठी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे सहकार्य लाभले आहे.