तळागाळातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात सक्षम

। खोपोली । प्रतिनिधी ।
वर्तमान स्पर्धेच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा शिरकाव होतो. मराठी मूलभूत शिक्षण प्रक्रिया बाजूला ठेवले जाते. अशा कठीण काळात गोरगरीब, दिन दलित, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात काम करीत असताना शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचवण्यासाठी प्राथमिक शिक्षकांचे योगदान मोठे आहे. याहीपेक्षा अधिक प्रयत्नशील राहून शालेय शिक्षणाचा प्रसार व दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येक शिक्षक व समाज घटकांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन शिक्षक आ. कपिल पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्यावतीने रायगड जिल्हा परिषद शाळा चिलठन केंद्र तोंडली नारंगी शाळेच्या प्रमुख शुभांगी मोरे व डोणवत शाळेतील शिक्षक पंकेश पालांडे यांनाही गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे विनोद कडव, वृषाली पाटील, विश्‍वनाथ पाटील, आशा खेडकर, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या राज्य कोअर कमिटीच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील शिक्षक कार्य आढावा घेऊन त्यात अनेक कार्य, कौशल्य, शाळा विकास, आदी बाबी लक्षात घेऊन ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

Exit mobile version