कोस्ते खुर्द केंद्राच्या स्पर्धा उत्साहात

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा 5 डिसेंबर रोजी अतिशय उत्साहात पार पडल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ मंगेश खराडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात क्रीडा स्पर्धांचे अनन्य साधारण महत्त्व असून या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते. आम्ही सुद्धा अशाच स्पर्धांमधून घडलो. सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे खेळात सहभागी होऊन खिलाडीवृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन मंगेश खराडे यांनी केले. यावेळी उद्घाटन प्रसंगी सरपंच मोरे, केंद्रप्रमुख संजय पालांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सत्वे आदि उपस्थित होते.

त्यानंतर सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग व ग्रामस्थांनी क्रीडा स्पर्धेची शपथ घेतली. या स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट अंतर्गत लगोरी, दोरी उड्या, लंगडी, बेचकी, मातीशिल्प, समूहगायन, समूह नृत्य, पथनाट्य अशा विविध खेळात सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. बेचकी खेळातील व विविध स्पर्धेतील आदिवशी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

Exit mobile version