| कोर्लई | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मानिवली या गावचे आगरी समाजातील ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत लढणारे पहिले शहिद हिराजी पाटील यांचा शुक्रवार 2 जानेवारी रोजी स्मृतिदिनानिमित्त त्याच्या कार्याची ओळख आगरी समाजातील तरुण, तरुणी, शालेय विद्यार्थी समाज बांधवांना व्हावी. यासाठी रायगडचा युवक फाऊंडेशनने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शुक्रवार 2 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता आदर्श पतसंस्थेच्या अलिबागेतील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात मान्यवरांकडून स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार आहे.
यामध्ये अलिबाग तालुक्यातील इयत्ता 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी ते 15 वी गट, व खुल्या गटात सर्वाना भाग घेण्यास आवाहन केले होते, यात शहिद हिराजी पाटील यांचे जीवन चरित्रावर 2 पूर्ण ताव मराठीत पाठवावा. असे प्रसिद्ध केले होते. यामध्ये गटास प्रथम क्रमांक रु.501, द्वितीय क्रमांक रु.300, तृतीय रु.200 व प्रमाणपत्र असे बक्षीस आहे. या पहिल्याच स्पर्धेत आर.सी.एफ. माध्यमिक विद्यालय कुरुळ, जनरल अरुण कुमार वैद्य माध्यमिक विद्यालय, जे.एस.एम.कॉलेज येथून 50 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना मान्यवरांकडून बक्षिस वितरण व मार्गदर्शन होणार असून सहभागी विद्यार्थी-पालकांनी उपस्थित रहावे. सहभाग घेणाऱ्यांना समारंभात बक्षीस, प्रमाणपत्र, त्वरित देण्यात येणार असून नंतर मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, असे प्रा.डॉ. जयपाल पाटील यांनी कळविले आहे.







