पालीवाला महाविद्यालयात स्पर्धा

परीक्षा केंद्र सुरू
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार पालीतील शेठ जे एन. पालिवाला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या नवीन बॅचचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सु. ए. सोसायटीचे रवींद्र लिमये हे होते. तर तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे, गटविकास अधिकारी विजय यादव, महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्या डॉ अंजली पुराणिक हे प्रमुख अतिथी होते.
तरुणांनी आपल्या क्षमता ओळखणे आवश्यक आहे. ध्येय निश्‍चित करून त्यानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे, असे लिमये म्हणाले तर उपजिल्हाधिकारी उंडे यांनी स्पर्धा परिक्षेबाबत माहिती दिली. यावेळी विश्‍वजित काईंगडे, एम. एस. लिमन, संतोष भोईर, स्नेहल बेलवलकर, ज्ञानेश्‍वर मुंडे, रासेयोचे स्वंयसेवक तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अजित खरोसे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अंजली पुराणिक यांनी केले.

Exit mobile version