युथ कौन्सिलतर्फे स्पर्धा उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |

खारघर युथ कौन्सिल सामाजिक संस्थाच्या वतीने खेळा एवं स्वस्थ रहा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉक्स क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन बीटू जेना यांनी केले. यावेळी लहान मुलांसाठी मोबाईल टू मैदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल मधील संघाने सहभाग घेतला. बॉक्स क्रिकेट सामन्यांमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. यावेळी बॉक्स क्रिकेट स्पर्धेत मायरा टायटन संघाने प्रथम क्रमांक पटकवला. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक सुर्याली युवा शान आणि लायन एलेव्हन संघाने प्राप्त केला. व्हॉलीबॉल स्पर्धेत जय हनुमान कळंबोळी संघ प्रथम तर द्वितीय क्रमांक कळंबोली रॉयल संघाने पटकवला.

Exit mobile version