ज्ञानदीप वाचनालयात स्पर्धा परीक्षा

| माणगाव | वार्ताहर |

वाचन वृद्धीसाठी विविध उपक्रम राबविणार्‍या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय माणगाव येथे उन्हाळी सुट्टीच्या पार्श्‍वभूमीवर स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन व बाल ज्ञान कोपरा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात वाचनालयामध्ये शुक्रवार (दि.28) रोजी करण्यात आली असून सदर उपक्रम पुढील काही दिवस ग्रंथालयाच्या वेळेत सुरू राहणार आहे.

विविध स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारी पुस्तके या प्रदर्शनात असून विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची पुस्तके या प्रदर्शनात मांडली आहेत. तसेच उन्हाळी सुट्टीच्या पार्श्‍वभूमीवर बाल वाचकांची संख्या वाढावी बालकांना वाचनाची आवड लागावी यासाठी बाल वाचन कोपर्‍याचे आयोजन केले आहे. या दोन्हीही उपक्रमात तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व बालवाचक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Exit mobile version