। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
एस.एन.डी.टी.च्या जुहू येथील स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच, महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.10) एस.एन.डी.टी.च्या श्रीवर्धन संकुलामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले. विद्यापीठाच्या कुलगुरू ऊज्वला चक्रदेव यांच्या संकल्पनेतून श्रीवर्धन येथील युपीएससी, एमपीएससी तसेच, बँकिंग व इतर अनेक प्रवेश परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थीनींसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याच्या उद्देशाने डॉ. महेश शितोळे यांच्या मार्गदर्शन व सहाय्याने हे केंद्र श्रीवर्धन येथे सुरु करण्यात आले.
या केंद्रातर्फे आयोजित केलेल्या पहिल्या कार्यशाळेमध्ये जितेंद्र पेंढारकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभले. मुलींना विद्यापीठाच्या सुरु होत असलेल्या युट्युब चॅनेल तसेच, ब्लॉगच्या माध्यमातूनही आपली तयारी करता येईल असे प्रतिपादन डॉ. डी.पी. राणे यांनी केले.