| रेवदंडा | प्रतिनिधी |
चौल-आग्राव रस्ता नुतनीकरणाचे कार्यारंभ आदेश सहा महिन्यांपुर्वीची निघाले होते. तरी देखील या रस्ताच्या नुतनीकरणाचे काम उद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे संप्तत चौल ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीत आढावा सभा संपल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांसमोर गाऱ्हाणे मांडले. यावेळी जिल्हाधिकारी रायगड व ग्रामसडक योजनेचे अधिकारीवर्ग उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील चौल-आग्राव हा सुमारे 3 किमीचा रस्ता डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंअंतर्गत मंजूर झाला होता. हे काम हैद्राबादच्या मे. सुधाकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मिळाले आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश सुद्धा निघालेला आहे. मात्र, तरीदेखील 6 महिने उलटले तरी अद्याप चौल-आग्राव रस्ता नुतनीकरणाचे काम सुरू झाले नसल्याची तक्रार खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे करण्यात आली. पावसाळ्यापर्यंत कोणतेही कारण ने देता चौल-आग्राव रस्तावरील खड्डे पुर्णपणे बुजवून रस्ता पुर्ववत करून द्यावा. अन्यथा उग्र आंदोलन किंवा चौल बंद आंदोलन करण्यात येईल व त्यांची संपुर्ण जबाबदारी संबधीताची राहील, असा इशारा यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच अजीत गुरव, विभाग प्रमुख मारूती भगत व उपस्थित असंख्य चौल ग्रामस्थ यांचे समवेत देण्यात आला.