आधी रस्त्याची कामे पूर्ण करा, मग टोल घ्या – जोग

| कोर्लई | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एनएच-66 पळस्पे ते इंदापूर रस्ता, वडखळ-अलिबाग रस्ता व सर्विस रस्ता अत्यंत खराब, साईन बोर्ड, अयोग्य स्पीड ब्रेकर्स, अपुर्‍या उंचीचे डीव्हायडर्स, पेव्हर ब्लॉक्स, पथदिवे आदी योग्य झाल्याशिवाय झाल्याखेरीज टोल आकारण्यात येऊ नये, अशी मागणी अलिबाग येथील दिलीप जोग, समीर पालकर व अनुज पालकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या प्रकल्प अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एनएच-66च्या तसेच वडखळ रस्ता व सर्विस रस्ते यांच्या दुर्दशेबाबत विशेष करून पळस्पे ते इंदापूर टप्प्यामध्ये संपूर्ण रस्ता सुव्यवस्थित करण्याकरता आम्ही वेळोवेळी आंदोलने केली आहे. सदर आंदोलनांना जिल्हाधिकारी यांनी त्या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे प्रशासकीय अधिकार्‍यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्‍वासन दिले. अशी परिस्थिती असतानासुद्धा आपले खाते लबाडीने टोल वसुलीच्या मागे लागले आहे. याचा आम्ही निषेध करत असून, वरील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नका, अशी मागणी दिलीप जोग व सहकार्‍यांनी केली आहे.

Exit mobile version