रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण करा

अजित पवारांची मागणी
| नागपूर | प्रतिनिधी |
समृद्धी महामार्गाप्रमाणेच रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाकडे सरकारने गांभीर्याने बघून कोकणातही समृद्धी आणावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
गुरुवारी सभागृहात अंतिम प्रस्तावावर चर्चा करताना पवारांनी अनेक मुद्यांचा परामर्श आपल्या भाषमातून घेतला.मुंबई -गोवा महामार्गाच्या मुद्यावरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.समृद्धी महामार्गाने कोणा कोणाची समृद्धी झाली, प्रत्येकाने अंर्तमनाने विचारवं कोणा कोणाची समृद्धी झाली. पण, नागपूर-गोवा महामार्ग करत असताना, गोवा-मुंबई 2011 साली कामाला सुरुवात झाली. तेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं. 2014 पासून मोदी सरकार सत्तेत आलं. तरीही सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीतील लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवारांनी केली.


वारे पट्टे, राज्यपालांचाा समाचार!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्यावरून पवारांनी समाचार घेतला. मुंबईचे महत्व उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबईसाठी 106 जणांनी हुतात्म पत्करलं आहे. मुंबईबद्दल 5 वेळा राज्यपालांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केलं. मगुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईच्या बाहेर काढलं तर पैसा उरणार नाही, असं राज्यापलांच्या वक्तव्याचा दाखला देत अजित पवार म्हणाले, वारे पट्टे ही भाषा राज्यपाल महोदयांची आहे. पण, कशासाठी असे बोलत आहात, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांचा टोला
गेली दोन वर्षे विदर्भात अधिवेशन झालं पाहिजे, अशी मागणी करण्यात येत होती. सरकार बदललं नसते तर विदर्भात अधिवेशन झालं नसते. चीन, कोरीया आणि जपानमध्ये वाढत्या रुग्णांचा निकष इकडे लावला असता. अजित पवारांना माहिती, लॉकडाऊन आणि करोना कोणाच्या आवडीचा विषय आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

फडणवीसांचा सल्ला
अजित पवार यांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं. पण, यंदा 100 टक्के भाषण अजित पवारांचं वाटत नव्हते. 50 टक्के जयंत पाटील यांचही होतं. जयंत पाटील सभागृहात नसल्याने अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास तुमच्या भाषणातून होत होता. वीज तोडण्याचा जीआर मी ट्वीट देखील केला. फेसबुकर टाकला आणि सगळ्यांना पाठवला देखील, तरीही तुम्हाला कसं काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्वीटरवर फॉलो करा, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना लगावला.

Exit mobile version