। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील श्रमिक माध्यमिक विद्यालय चिल्हे येथे सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज अंतर्गत सुदर्शन सी.एस.आर विभागाच्यावतीने शुक्रवारी (दि.18) अग्निशमन प्रतिबंधक यंत्र प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले.
सुदर्शन सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झालेल्या उपक्रमामुळे आपल्याला आग लागल्यास कशाप्रकारे योग्य प्रकारे प्रतिसाद द्यावा आणि आपले जीवन, तसेच शाळेतील इतरांची सुरक्षा कशी बाळगावी, याबद्दल आवश्यक माहिती देण्यात आली. तर, प्रमुख मार्गदर्शकांनी प्रशिक्षणात प्रशिक्षकांनी अग्निशमन यंत्रांचा योग्य वापर, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. शाळा गोवे, मुठवलो, शिरवली, चिल्हे, तळवली आणि भिसे तसेच श्रमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणाला सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज सी.एस.आर विभागाचे महेश डेरीया, अमर चांदणे उपस्थित होते.
अग्निशमन प्रतिबंधक प्रशिक्षण संपन्न
