आदिवासी बांधवांसाठी संकुल उभे करणार ; महेंद्र थोरवे

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी संकुल उभे करायचे आहे, त्यास्तही जागेची उपलब्धता करून द्या आणि आपण तात्काळ या कामाला मंजुरी दिली जाईल असे आश्‍वासन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले. कर्जत तालुका आदिवासी ठाकूर संघटनेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आमदार थोरवे बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या माधवी नरेश जोशी यांनी आदिवासी समाज सभागृह बांधण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्‍वासन जोशी यांनी दिले. आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत यांच्या माध्यमातून भवानी माता मंदिर कशेळे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळ जि. प.माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, रेखा दिसले, माधवी नरेश जोशी, जयवंती हिंदोळा, सुरेख हरपुडे, उषा पारधी, ऋषीकेश राणे, भास्कर दिसले, मालू निरगुडा, परशुराम दरवडा, भगवान भगत, मंगळ केवारी, पांडूरंग पुजारी, खजिनदार अर्जून केवारी, गणेश पारधी आदी उपस्थित होते.

10वी 12 वी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना कै.प्रमिला विष्णू वारे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, बॅग 9 विद्यार्थांना 1000 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक म्हणून मोहन वारघडा, बबन निरगुडे यांना देण्यात आला. यामध्ये इयत्ता 12वी सायन्स मधून अलिशा विजय बांगारे पेटारवाडी, गोपाळ गजानन पारधी सावरगाव, कॉमर्स. पायल सोनू लोभी लोभेवाडी, काश भगवान भगत. भक्ताचीवाडी, कला रोहिणी नामदेव कांबडी कोतवालवाडी, दिशा गणेश पारधी बेकरेवाडी, निकिता कृष्णा पारधी टपालवाडी आणि 10 वी प्रथम तीन क्रमांक करुणा दुंदा कांबडी कोतवालवाडी, करण मालू मेंगाळ डामसेवाडी, धनाजी जगन पादीर, पादिरवाडी चाफेवाडी. विशेष प्राविण्य सानिया अनंता वारघडे सागाचीवाडी. या सर्वांचा सत्कार करण्यात आला एकूण 120 विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version