1 ऑक्टोबरनंतर कडक कारवाई
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठीमध्ये असणे हे बंधनकारक आहे. तसे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता मुंबई महापालिकेने सुद्धा आपल्या हद्दीतील दुकाने व आस्थापनांना तीन वेळा मुदत वाढ करून देण्यात आली होती. तिसऱ्यांदा दिलेली मुदतही आता संपत आलेली असताना केवळ 40 टक्के दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये करण्यात आल्या आहेत. उर्वरित 60 टक्के दुकानदारांना काही दिवसात आपल्या दुकानावरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वीच हा नियम काढण्यात आला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दुकानदारांसाठी पालिकेने मुदत वाढ दिली होती. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या अजूनही लावल्या नाहीत, त्यांच्यावर 1 ऑक्टोबरनंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील सर्वच दुकानदारांसाठी हा सक्तीचा नियम केला आहे.
Support authors and subscribe to content
This is premium stuff. Subscribe to read the entire article.